
धुळे LCB कामगिरी महामार्गावर हजारों रूपयांच्या गुटखासह,ट्रक व 2 जणांना अवैधरित्या वाहतूक करताना केले गजाआड
धुळे LCB कामगिरी महामार्गावर हजारों रूपयांच्या गुटखासह,ट्रक व 2 जणांना अवैधरित्या वाहतूक करताना केले गजाआड
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ) : देशात लॉक डाऊन परिस्थिती असतानाही महाराष्ट्र राज्यात महामार्गावरून अवैधरित्या वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन जणांसह हजारो रुपयांचा सुगंधी गुटका पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना परराज्यातून महामार्गाहुन चोरट्या मार्गाने वाहतूक करून शहरात परराज्यातील सुगंधी गुटखा आणून जादा दराने विक्री करण्यात येत आहे.अशी माहिती खबरी मार्फत पो.नि.बुधवंत यांना मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी एक पोलीस पथक तयार करून महामार्गावरील आर्वी ओपी जवळ नाकाबंदी लावून वाहन तपासणी सुरू केली.
याच दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील शिरुडकडुन ट्रक क्रं.एम एच 41 ए जी 8083 ह्यात सुगंधी माल भरलेला गुटखा घेऊन आर्वी मार्गाकडे जाताना ट्रकला पोलीसांनी तपासणी नाक्यावर अडविले चालक आसिफ अहमद सय्यद,जाकिर दगू शेख यांना कागदपत्रे बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.ट्रकची तपासणी केली असता त्यात गुटखा पाकिटे आढळली.
पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन एल सी बी कार्यालयात आणून त्या दोघांन विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. यात एकुण मालाची किंमत ट्रकसह, गुटखा माल किंमत 6 लाख,26 हजार 400 आहे. ट्रकसह चालक व क्लिनर यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
सदर कारवाई ही जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.पथकाने केली आहे.