Dhule jijamata crime

धुळे : जिजामाता इंटरप्राईजेस : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला मोठा अनर्थ

धुळे
Share This:

धुळे: जिजामाता इंटरप्राईजेस प्रकर्ण- पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

धुळे (विजय डोंगरे ): धुळे येथील गल्ली नंबर 6 मध्ये अपार्टमेंटमध्ये बेसमेंट खालील गाळ्यात जिजामाता इंटरप्राईजेस नामक थाटलेल्या दुकानात दिपक पाटील नामक व्यक्ती  काही महिलांना रोख पाच हजार रुपये घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी साहित्य व साहित्य पॅकिंग करता एक किट देतो.या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत त्याचे विश्र्वास संपादन करून अत्ता पर्यत 250/300 महिलांन कडून रोख तीन /पाच तर काहींन कडून 25 हजार,दिड लाख हि रोखीने घेतले.व त्यांना काही हजारांचे धनादेश दिले आहे.याच प्रकारे जिल्ह्याभरात दिपक पाटील ने चार-पाच शाखा उघडल्या आणि एकूण त्यांच्याकडे सभासद संख्या एकूण तीन ते चार हजार आहे. अशा प्रत्येक व्यक्ती कडून रोख रक्कम 5000 ते1000  घेऊन त्यांना काही कमी प्रमाणामध्ये जुना माल  विक्रीसाठी देतो.

असे सांगून त्यांने कोटीच्या घरात महिलांना गंडवले आहे.आज दुपारी त्याचे कार्यालयात काही महिला पैसे व साहित्य घेण्यासाठी आल्या त्यावेळी त्यांच्याशी दीपक पाटील यांची शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी दीपक पाटील याने पैसे व साहित्य देण्यास नकार केला त्यावरून हा वाद वाढला यावेळी आग नगर पोलिसांनी मध्यस्थी केली दीपक पाटील याला ताब्यात घेतले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता कार्यालयाबाहेर एक फलक लावला आहे त्यावर लिखित मजकूर आहे की दुपारी 4 नंतर कार्यालयात यावे व आपला धनादेश घेऊन जा असा एका काळ्या फळ्यावर मजकूरही लिहिलेला आहे.त्याचेकडे करोडो रुपये जमा झाले आहे.दिपकलाच कोणी गंडवले का नवीन त्याच्याजवळ घेतलेल्या लोकांचे पैसे परत द्यायला पैसे नाही का दीपक अगोदर सट्टा पिढीवर कामाला होता.तर दीपक काही लोकांना मी केमिकल इंजिनियर आहे असेही सांगतो यामुळे नागरिक संभ्रमात आहेत त्याचे गल्ली नंबर 6 मधील दुकानाजवळ संतप्त महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यावेळी दीपक विषय वेगवेगळ्या चर्चांना ऊत आले होते.

परंतु अत्ता पर्यंत दीपक पाटील कडे रोखीने द्यायला त्याच्याकडे पैसे नाही.यामुळे महिला संतप्त झालेल्या होत्या.दीपक पाटील घेतलेले पैसे परत द्यावेत धनादेश घेऊन पैसे रोखीने परत द्यावे याकरिता कार्यालयासमोर महिला व अन्य नागरिकांची गर्दी झालेली होती.

कार्यालयासमोर संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती.कार्यालयात काही महिला दीपक पाटील व पुरुष यांच्याशी शाब्दिक वाद घालत होते. मोठा गोंधळ सुरू होता ही माहिती आझादनगर पोलिसांना कळाली यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता आझादनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी दीपक पाटील यांना ताब्यात घेतले . आझाद नगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. परिस्थिती नियंत्रणात आली कार्यालयाबाहेर गोंधळ सुरू होता पैसे कधी मिळतील मिळतील का नाही याबाबत महिलांनाही शंका वाटत होती.

महिलांची तक्रार अद्याप आली नाही.याबाबत सविस्तर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे आझाद नगर पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी नंतर आझाद नगर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले.त्याचे कडून त्याने केलेल्या व्यवहाराची चौकशी करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *