धुळे: 2 दिवसापासून घरात पडला होता इसमाचा मृतदेह

Featured धुळे
Share This:

2 दिवसापासून घरात पडला होता इसमाचा मृतदेह पोलीस प्रशासन वेळेवर हजर मात्र मनपा चा व आरोग्य विभागाचा गलथन कारभार चव्हाट्यावर

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) :  आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जुनेधुळे भागातील सावता माळी शाळा परिसरातून दीपक माळी या स्थानिक रहिवासी यांचा SPO Adv सचिन जाधव यांना कॉल आला की तिथे एका घरात 2 दिवसापासून एका घरातून खूप घाण वास येत आहे त्याठिकाणी राहणारा नामे सदाशिव माळी वय-५५ वर्ष मरून पडलेला आहे,आणि लागलीच जुनेधुळे पोलीस चौकीचे इंचार्ज अविनाश वाघ यांना माहिती दिली व त्यांनी लागलीच आझदनगर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक आहेर सरांना कॉल करून घटनास्थळी बोलून घेतले पोलीस अधिकारी व कर्मचारी अमोल आव्हाड,जितेंद्र परदेशी, नरेश चव्हाण,सुनील पाथरवट,दीपक भोई,पो.को.चौधरी,हटकर, SPO Adv सचिन जाधव, गणेश बडगुजर आदी घटनास्थळी 5.30 वाजेपासून हजर होते व त्याठिकाणहुन मनपा च्या आरोग्य विभाग, आयुक्त,उपायुक्त सर्वांना अँबुलन्स घटनास्थळी पाठवण्यासाठी फोन केले परंतु 2.30 तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी मनपा कडून साधी अँबुलन्स ची व्यवस्था होऊ शकली नाही शेवटी पोलिस अधिकाऱ्यांनी च खाजगी अँबुलन्स बोलवून सदरचा मृतदेह सिव्हील हॉस्पिटलमध्ये पोस्ट मार्टम साठी दाखल केला मृतदेह अँबुलन्स ठेवल्यानंतर तबबल 3 तासाने आरोग्य विभागाच्या दोन महिला कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाल्या यावरून मनपा प्रशासन नागरिकांसाठी किती तत्पर आणि काळजीवाहू आहे हे त्यांच्या गलथन करभरावरून स्पष्ट होते.

यावेळी स्थानिक नगरसेवका पैकी एका नगरसेविकेचे वडील हजर होते तर नगरसेवक विजय जाधव हे ही उपस्थित होते परंतु नगरसेविकानी मनपा आरोग्य विभागात सम्पर्क करून ही अँबुलन्स ची व्यवस्था होऊ शकली नाही,मनपा च्या या गलथन करभारावर स्थानिक लोकांनी आक्रोश व्यक्त केला तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी देखील मनपा च्या या गलथन कारभारावर भयंकर नाराजी व्यक्त केली तसेच स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधी परिसरात काही झाले तर तात्काळ पोलिसांच्या मदतीची अपेक्षा करतात वारंवार फोन करतात मग अशा अतिमहत्त्वाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्यास स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधी मागे का असतात,अशा प्रकारे पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिक पुढारी व लोकप्रतिनिधी यांच्या विषयी ही नाराजी व्यक्त केली आहे.

सदर मृतदेह अँबुलन्स मध्ये सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेल्या नंतर नगरसेविका वडील दिनेश बडगुजर व नगरसेवक विजू जाधव यांनी मनपा सायनिटीझर गाडी बोलवून सम्पूर्ण भागात स्यानिटायझर ने फवारणी करण्यात आला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *