धुळे: नारायण अपार्टमेंटमधील डॉक्टर यांचे घर फोडून अर्धा किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली.
धुळे (विजय डोंगरे ): धुळे शहरातील नगरातील मधुबन कॉलनी जवळील यशराज आपारमेंट प्लॉट नंबर 9 व श्री नारायण आपारमेंट प्लॉट नंबर 2 फोडून चोरट्यांनी चांदी लंपास केली. अग्रवाल नगरातील पॉश एरियातील दोन अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. अगोदर चोरटे श्री नारायण आपारमेंट मध्ये आले त्यातील प्लॉट नंबर 2 डॉक्टर राजेंद्र वाडेकर यांच्या लोखंडी दाराचे कुलूप तोडून गाडी कोंडा तोडून आत प्रवेश करून लोखंडी कपाट फोडून त्यातील लोकलमधील कप्प्यातील अर्धा किलो चांदीचा भार त्यांनी काढून घेतला व अन्य कपाटातील सगळे साहित्य जमिनीवर फेकून चोरट्यांनी जातं कडे कोंडा तोडण्यासाठी आणलेले साहित्य बाहेर फेकून दिले तेथून जवळच असलेल्या मधुबन कॉलनी जवळील यशराज आपारमेंट प्लॉट नंबर 9 येथे चोरट्यांनी प्रवेश केला चोरट्यांनी आजूबाजूचे फ्लॅटमधील बाहेरच्या दरवाजांच्या कड्या लावून बंद करून घेतल्या व प्लॉट नंबर 9 सुधीर पांडुरंग कासार हे बाहेरगावी गेले होते त्यांच्या घराच्या दाराला कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून तेथील लाकडी व लोखंडी कपाट फोडून कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून एका बागेमध्ये असलेला चाकू व काही चिल्लर चोरट्यांनी लंपास केली.
चोरट्यांनी केव्हा कासार यांचा दरवाजा फोडला त्यावेळेस बाजूची अपार्टमेंटमधील नागरिकांना जाग आली होती. त्यांनी आरडाओरडा केला.फ्लॅटला चोरट्यांनी बाहेरून कड्या लावल्यामुळे नागरिकांना बाहेर येता आले नाही. त्यांनी पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला परंतु चाळीसगाव रोड पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही .सकाळी सहाच्या दरम्यान बाजूच्या लोकांना आवाज दिल्यानंतर त्यांनी दार उघडले त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली .पोलिस घटनास्थळी आले त्यांनी पाहणी केली. चोरट्यांनी फेकलेल्या साहित्य ताब्यात घेतले. अधिक मदतीसाठी फिंगरप्रिंट तज्ञ व श्वान पथकाची मदत घेण्यात आली.
डॉक्टर वाडेकर यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाणे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून अर्धा किलो चांदी लंपास केल्या प्रकरणी लेखी तक्रार नोंद केली आहे. याबाबत जवळपास अपार्टमेंटमधील लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार चोरटे दोन काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर तोंडाला फडके बांधुन अपार्टमेंट मध्ये प्रवेश करताना कैद झालेले आहे. याच फोटोच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.