
धुळे: मार्च २०२० ते लॉक डाऊन अखेरपर्यंत काळातील घरगुती वीज बिल माफ करा- आमदार डॉ. फारूक शाह
धुळे: मार्च २०२० ते लॉक डाऊन अखेरपर्यंत काळातील घरगुती वीज बिल माफ करा- आमदार डॉ. फारूक शाह
धुळे: (तेज समाचार प्रतिनिधि): मंगळवार दि. ३१ मे २०२० केंद्राच्या सूचनेनुसार राज्यात देखील दिनाक २४ मार्च २०२० पासून पहिला लॉक डाऊन करण्यात आला. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात लॉकडाऊन-४.० चौथा टप्पा मे २०२० अखेरपर्यंत तर जून चा पंधरवाडा देखील कायम राहण्यासारखी अवस्था आहे. लॉक डाऊन काळात सर्वसामान्यांची उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने तसेच शासकीय निर्देशांप्रमाणे घरात राहण्याच्या सूचना असल्याने उन्हाळ्यात सर्वसामन्य नागरिक घरात बसून होते. साहजिकच विजेचा वापर देखील बहुतांशी घरामध्ये सरासरीपेक्षा जास्त झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉक डाऊन मुले हातावर पोट असणाऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद असल्याने आपणास विनंती करण्यात येते कि, घरगुती वीज वापराचे विद्युत देयके माहे मार्च २०२० ते लॉक डाऊन संपेपर्यंत अथवा लॉक डाऊन संपल्यानंतर १ महिना या कालावधीसाठी पूर्णपणे माफ करण्याबाबात सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन वीज बिल वसुली न करण्याबाबत सकारात्मक योग्य तो निर्णय घेण्यात येऊन वीज बिल वसुली न करण्याबाबत सूचना शासन निर्णयान्वये / परिपत्रकाद्द्वारे जारी करण्यात यावा या आशयाचे निवेदन आमदार डॉ. फारूक शाह यांनी उर्जा मंत्री नामदार नितीन राऊत साहेबांना इमेल द्वारे दिले आहे.