धुळे: डंपर ट्रकच्या अपघातात परप्रांतीय मजूर ठार

Featured धुळे
Share This:

धुळे: डंपर ट्रकच्या अपघातात परप्रांतीय मजूर ठार

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): देशात विविध भागात अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी मिळाल्याने अनेक परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहे. त्यातच महामार्गावर डंपर आणि ट्रकचा अपघातात एक परप्रांतीय मजूर जागीच ठार झाला. ही घटना रिलायंस पेट्रोलपंप जवळ १४ मे रोजी रात्री १.३० वाजे च्या सुमारास घडली.

शहरातून दररोज हजारो मजूर ट्रॅक, डंपर आदी वाहनाने महामार्गावरून जात आहे. तसाच एक डंपर (क्रमांक एम एच ४८ ए जी ५४२७) जात असताना समोरून येणाऱ्या ट्रॅकने (क्रमांक ओडी १८ पी ३९३३) त्यास धडक दिली. या अपघातात डंपर मध्ये पुढे बसलेल्या परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. तसेच डंपर मध्ये मागे बसलेले परप्रांतीय मजूर 15 ते 20 पुरुष व स्त्रिया व लहान मुले जखमी झाले आहे. घटनास्थळी पोलिस आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *