
धुळे: पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हस्ते अन्नदान
धुळे: पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हस्ते अन्नदान
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): धुळे जिल्हाचे पाेलिस अधिक्षक श्री. चिन्मय पंडीत यांच्या हस्ते आज सकाळी साेनगीर येथे अन्नदान व फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दाऊळ येथील केशरानंद परिवाराकडून साेनगीर येथील केशरानंद मंगल कार्यालय, माजी नगरसेवक रविराज ज्ञानेश्वर भामरे (पाटील) यांनी पाेलिस बांधवांना माेफत उपलब्ध करून दिले. पाेलिस प्रशासनाकडून परप्रांतीय मजुरांना अन्नदान वाटप करण्याचा कार्यक्रम पाे. अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी हाती घेतला आहे. गाेरगरीब, गरजू व उपाशी लाेकांना अन्न पाणी व निवाराची व्यवस्था करण्यात येत आहे.
साेनगिर येथे आज जिल्हाचे पाेलिस अधीक्षक श्री. चिन्मय पंडीत, ए. पी. आय.प्रकाश पाटील, तर माजी नगरसेवक रविराज भामरे यांच्या हस्ते रस्त्याने पाई चालणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्नदान व फळवाटप करण्यात आले.
यावेळी साेनगीर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. तर माजी नगरसेवक रविराज भामरे यांच्या सह समाजसेवी संस्था व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी पंधरा ते वीस दिवस गरजुंना अन्नदान, फळ व पाणी वाटप केले जाईल असे सांगितले. तर साेनगीर येथील मंगल कार्यालय पाेलिस बांधवांच्या कार्यक्रमांसाठी माेफत उपलब्ध करून दिले आहे. असे श्री रविराज भामरे यांनी सांगितले. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासन प्रशासन सर्वताेपरी मदत करीत असतांना देशाचा नागरिक या नात्याने आपले देखील कर्तव्य आहे. म्हणून यथाशक्ती जी काही मदत लागेल ती केशरानंद परिवाराकडून करण्यात येईल. असे श्री. भामरे यांनी यावेळी सांगितले.