
धुळे : मुख्य बाजारपेठेतील क्रांती कॉम्प्लेक्स मधील आगीत 2 दुकाने जळून खाक
धुळे : मुख्य बाजारपेठेतील क्रांती कॉम्प्लेक्स मधील आगीत 2 दुकाने जळून खाक
हजार रुपयाचे नुकसान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरूच!
धुळे (तेजसमचार प्रतिनिधि): धुळे शहरातील गल्ली नंबर 4 मधील क्रांती कॉम्प्लेक्स मधील दोन दुकानांना अचानकपणे आग लागून हजार रुपयाचे नुकसान झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले शहरातील मुख्य बाजारपेठेतील क्रांती कॉम्प्लेक्स मधील एका दुकानाचे शटर मधून सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान धूर येताना दिसला यावेळी मदतीसाठी नागरिकांनी आरडाओरड केली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूला असलेल्या दुकानांमध्ये आग पसरली . काही नागरिक मदतीसाठी धावले त्यांनी बाटलीतील पाण्याने आगीवर पाणी मारा करण्यास सुरुवात केली परंतु आग आटोक्यात येत नव्हती. आगीबाबत मनपा अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली.
या परिसरात सध्या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे तिथे मदतीसाठी अडथळा निर्माण होत होता. काहीवेळाने मनपा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली परंतु या आगीत दोन दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते .
या कॉम्प्लेक्समध्ये आठ ते दहा दुकाने आहेत त्यांनाही काही अंशी आगीची झळ पोहोचलीची माहिती सूत्रांकडून मिळाली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्नि उपद्रव 3/7 प्रमाणे आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
महामार्गावरील द बर्निंग ट्रक याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावर पहाटेच्यावेळी चाळीसगाव रोड वरील एका गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला आग लागली या आगीची माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले .
आगीवर पाणी मारा करून तातडीने त्यांनी आग आटोक्यात आणली यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.आगीत ट्रकचे कॅबिंन जळून खाक झाले.यात हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते