धुळे: घाबरून न जाता मनपा आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला सहकार्य करा – आमदार डॉ. फारूक शाह

Featured धुळे
Share This:

धुळे: घाबरून न जाता मनपा आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला सहकार्य करा – आमदार डॉ. फारूक शाह

 

धुळे (तेज समाचार प्रतिनिधी):  एप्रिल मंगळवार रोजी धुळे महानगरपालिका धुळे च्यावतीने स्क्रिनिंग टेस्ट प्रभागा प्रभागामध्ये सुरू आहे. या आधी आमदार डॉ. फारूक शाह यांनी स्वतः जबाबदारी घेऊन श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे आपल्या सोबत घरातील व इतर असे एकूण 54 लोकांना घेऊन जाऊन तपासणी करून घेतली. त्यात आमदार शाह यांच्या समवेत सगळेच अहवाल निगेटिव्ह आले होते. या अहवालांमध्ये फक्त 3 अहवाल जे पोझीटीव्ह होते. सदर तिन्ही जण श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. या 3 जणांची काल पुन्हा तपासणी केली असता त्यांचा तपासणी अहवाल आज आला व तो सुदैवाने निगेटिव्ह आहे. धुळेकर जनतेसाठी ही एक सुखद बाब आहे. याचाच एक भाग म्हणून जनतेने घाबरून न जाता मनपा आरोग्य यंत्रणेला व आरोग्य व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन आमदार डॉ. फारूक शाह यांनी केले. याचा एक भाग म्हणून त्यांनी आज स्वतः पुन्हा धुळे महानगरपालिका आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आपली स्वतःची व इतरांची स्क्रिनिंग टेस्ट करून घेतली व ती चांगली असल्याचे उपस्थित तज्ज्ञांच्या सल्ल्याने सांगण्यात आले. यावेळी आमदार डॉ. फारूक शाह यांनी इतर होम विलग्नवास केलेल्यांची देखील तपासणी करून घेतली. तरी धुळेकर जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *