धुळे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या वाहनांना नाकाबंदी तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धुळे शहरात विविध उपाययोजना करा… आमदार डॉ. फारूक शाह यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार डेस्क): आज दि. १०-०४-२०२० कोरोना आता जवळच्या शहरांमध्ये अर्थातच जळगाव व मालेगाव येथे येऊन ठेपला आहे. कालच धुळे शहरापासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या मालेगावमध्ये  कोरोनाचे ५ बाधित रुग्ण आढळून आले. महोदय मालेगाव या शहराकडून खासकरून मुंबई आग्रा महामार्गावरून मालेगाव- नाशिक – मुंबई – नगर – पुणे या अतिशय कोरोना बाधित असलेल्या क्षेत्रातून येणाऱ्या खाजगी व इतर वाहनांना धुळे शहरात येण्याआधी शहरालगत असलेल्या सर्व सीमारेषांवर खास करून लळिंग टोल नाक्याआधी थांबवून अत्यंत महत्वाचे काम असल्यास त्यांची पोलिसांच्या मदतीने आरोग्य विभागाकडून वैद्यकीय तपासणी करून मगच शहरात प्रवेश दिला जावा. जेणेकरून धुळे शहरात कोरोनाचा शिरकाव होणार नाही व जनतेच्या आरोग्यास हानी पोहचणार नाही. धुळे जिल्हा पोलीस दल अत्यंत चांगले काम करत असून त्यांचे आभार मानतो. तसेच पोलिसांनी छुप्या मार्गाने सोनगीर – अमळनेर तसेच चाळीसगाव व साक्री कडून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी व अत्यंत आवश्यक असल्यास त्यांना प्रवेश द्यावा.
धुळे शहरातील सदयस्थिती बघता अनेक गोर-गरीब, कष्टकरी जनतेचे काम धंदे व लहान व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक स्त्रोत बंद झाला आहे यामुळे गरीब व कष्टकरी कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे. या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून मोठ्या प्रमाणात केशरी शिधापत्रिका धारकांना व इतरांना अन्नधान्य मिळत नाही यावर तात्काळ उपाययोजना सर्वांना किमान अन्न धान्य उपलब्ध करून द्यावे. तसेच शहरातील अनेक किराणा दुकानदार व इतर भुसार माल विक्रेत्यांकडून ज्यादा व चढ्या दराने किराणा मालाची विक्री होत आहे, काही ठिकाणी MRP च्या भावा पेक्षा जास्त दराने विक्री होत असून त्यामुळे जनतेची उघडपणे लुट होत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी शहरात एका विशेष पथकांची नियुक्ती करून अश्या किराणा दुकानदार व इतर भुसार माल विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी. शहरातील विविध वसाहतींमध्ये आजही जंतू नाशक फवारणी (Sanitizing) झाली नसून ती करण्याची जनतेतून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. जंतू नाशक फवारणी (Sanitizing) देखील धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात एकदा पुन्हा नव्याने करण्यात यावी. यासर्व उपाय योजनांमुळे धुळेकर जनतेमध्ये समाधानाचे वातावरण होण्यास मदत होईल. या आशयाचे निवेदन आमदार डॉ. फारूक शाह यांनी जिल्हाधिकारी श्री. दिलीप जगदाळे साहेब यांना सादर केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *