
धुळे : करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू -मृतांची संख्या 3 वर
धुळे : करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू -मृतांची संख्या ३ वर
धुळे (तेज समाचार डेस्क): : शहरात सोमवारी (ता.२१) तिरंगा चौक परिसरात एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना आज तिसर्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या तीनवर पोहचली आहे.
जळगाव, नंदुरबार पेक्षा धुळे जिल्ह्यात संसर्गजन्य करोना व्हायरसची लागण झालेले अधिक रुग्ण वाढल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात साक्री तालुक्यातील पहिल्या करोनाबाधिताचा मृत्यू झाला होता.
एका बाधिताचा अहवाल येण्याआधीच धुळे शहरातील शासकीय महाविद्यालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर आज एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तो बाधित मालेगावला करोनाची लागण होण्यापूर्वी तेथे तीन वेळा तो गेला होता, अशी माहिती समोर येत आहे. त्याच्या संपर्कातील शंभराहून अधिक जणांना अलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.