धुळे: अवैधरित्या कंटेनर मधुन गुरांची निर्दयपणे वाहतूक- 4 गुरे मयत 2 फरार.

Featured धुळे
Share This:

धुळे: अवैधरित्या कंटेनर मधुन गुरांची निर्दयपणे वाहतूक- 4 गुरे मयत 2 फरार.


आझाद नगर पोलीसांनी कंटेनर ताब्यात घेतला


धुळे (तेजसमाचार प्रथिनिधी):अवैधरित्या कंटेनर मधुन गुरांची निर्दयपणे वाहतूक करताना आझाद नगर पोलीसांनी ताब्यात घेतला.

सविस्तर माहिती की, पारोळा रोड रस्त्यावर सार्वजनिक जागी एका बाजूला उभा असलेला कंटेनर क्रं. यु पी 21 सी एन 6572 मध्ये 25 गुरे निर्दयपणे दाटीवाटीने कोंबून अवैधरित्या चालक व सहचालक घेऊन जाण्याच्या तयारीत असताना आझाद नगर पोलीस वाहनातून हे कंटेनर येत असल्याचे दिसताच कंटेनर चालक व सहचालक तेथून फरार झाले.पोलीसांनी कंटेनर तपासणी केली असता गुरांची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले.या नंतर कंटेनर ताब्यात घेऊन गुरांना चाळीसगाव रोड येथील गौ शाळेत 25 गुरांना उपचारासाठी जमा करण्यात आले.उपचारा दरम्यान यातील चार गुरे दगावली आहे.
या प्रकरणी आझाद नगर पोलीसांनी कंटेनर चालक व सहचालक यांचे विरुद्ध पोशि संजय भोई यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.गुरे व कंटेनर एकुण 21,30,000 असा किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.त्या नुसार आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *