धुळे : लाखों रुपयांच्या गुटख्याने भरलेल्या आयशर टेम्पो सह दोघांना अटक

Featured धुळे महाराष्ट्र
Share This:

धुळे  (तेज समाचार प्रतिनिधि). परराज्यातून अवैधरित्या आयशर ट्रक मध्ये लादुन शहरातून मालेगाव कडे वाहतूक करून नेत असताना लाखों रुपयांचा गुटका पोलिसांनी जप्त केला.दोन जणांना गजाआड केले.

याबाबत मिळालेली माहिती की,चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांना खबरी मार्फत गोपनीय माहिती मिळाली.त्या आधारे पोलिसांचे एक पथक तयार करून त्यांनी सांयकाळच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग क्रं.3 मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुली वर पोलिसांनी सापळा रचला व वाहनांची तपासणी सुरू असून याच दरम्यान इंदूरहून मालेगाव कडे जाणारी आयशर ट्रक क्रमांक एम पी 09 जी.ई.1294 चौफुली जवळील आली या गाडीची तपासणी करत असताना यातून उग्र वास येऊ लागला वाहनचालक व सहचालक याला विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तर देऊ लागले. कागदपत्रे माहिती देण्यास टाळाटाळ करू लागले.पोलीसांनी दोघांना गाडीसह ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला आणून वाहनांची तपासणी केली.असता त्यात अवैधरित्या तंबाखू गुटखा पान मसाला लाकडी खोके खाली दाबून वाहतूक करताना कारवाई करण्यात आली.
त्यांचे कडुन एक आयशर ट्रक.
1) 19,80,000 रुपये किंमतीचा विमल पान मसाला भरलेल्या 50 गोण्या प्रत्येक गोणीची किंमत 39600 रुपये प्रमाणे.
2) 2,20,000 रुपये किमतीचा वी-1 तंबाखू भरलेल्या 50 गोण्या प्रत्येकी गोण्याची किंमत 4400 रुपये प्रमाणे
3) 8,00,000 रुपये किमतीची एक लाल रंगाची आयशर गाडी ट्रक क्रमांक एम पी 09 जी ई 12 94 असा एकूण 30,00,000 लाखों रुपयांचा माल चाळीसगाव रोड पोलिसांनी जप्त केला.
यात चालक रवी परबत खरते वय 25 व क्लिनर परबत नथ्थु वास्कले वय.45 बडवानी दोघे रा.मध्यप्रदेश यांना पोलीसांनी अटक केली आहे.

सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी राजू भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन अहिरे यांच्या मार्गदर्शनाने चाळीसगाव रोड पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे,पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले,पोकॉ तुकाराम पाटील, पोहेकॉ अजित शेख,पोहोकॉ सुनील शेंडे मुक्तार शहा,नरेंद्र माळी, संदिप खरे आदींनी ही कारवाई केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *