
धुळे Coronavirus Update : मृत करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांना ठेवले विलगीकरण कक्षात
धुळे Coronavirus Update : मृत करोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांना ठेवले विलगीकरण कक्षात
धुळे (तेज समाचार डेस्क) : शहरातील हिरे मेडीकलच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या मालेगाव आणि साक्री येथील दोघांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. गुरुवारी साक्री शहरातील ५५ वर्षी प्रौढ व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली हाेती. त्याच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविला हाेता. मात्र शुक्रवारी पहाटेपूर्वी १.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ मालेगाव येथील एक २२ वर्षीय तरुणी आज सकाळी उपचारा दरम्यान दगावली आहे. दि.७ एप्रिल रोजी अनेमिया या आजाराने त्रस्त असल्याकारणाने तिला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राज्यात करोनाचा फैलाव वाढत असताना धुळ्यातही करोना विषाणूने शिरकाव केला आहे. त्यात काल साक्रीतील एका ५३ वर्षीय प्रौढ आणि मालेगावमधील २२ वर्षीय तरूणीला करोनाची बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. या दोघांचाही मृत्यू झाला. आरोग्य विभागात़र्फे मृत पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटवर्तीयांचा शोध घेतला आहे.
शहरातील हिरे मेडीकलच्या विलगीकरण कक्षात तब्बल २४ निकटवर्तींयांना ठेवण्यात आले असून आरोग्य प्रशासन हादरले आहे. या २४ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून हे अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त होण्याचा अंदाज आहे. साक्री शहरातील व मालेगावातील ज्या भागात हे रुग्ण राहत होता, त्याठिकाणी आरोग्य विभागाने सर्व परिसर सील केला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ५३ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी १.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ मालेगाव येथील एक २२ वर्षीय तरुणी आज सकाळी उपचारा दरम्यान दगावली आहे.