
धुळे : वैद्यकीय महाविद्यालयात 29 रुग्णांचे करोना अहवाल निगेटिव्ह
धुळे : वैद्यकीय महाविद्यालयात 29 रुग्णांचे करोना अहवाल निगेटिव्ह
धुळे (तेज समाचार डेस्क) : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल २९ रुग्णांचे करोना विषाणूचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित अहवालाचे काम प्रगतीत असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. हिरे महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांचा तसेच जिल्ह्यातील इतर बाधित कुटूंबियांचा यात समावेश असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यात २५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ४ जणांचा यात मृत्यू झाला आहे.