
धुळे: ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीसीमांवरील गस्त आणखी वाढवावी: गृहमंत्री अनिल देशमुख
धुळे: ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीसीमांवरील गस्त आणखी वाढवावी: गृहमंत्री अनिल देशमुख
धुळे (तेज समाचार डेस्क) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्याच्या सीमांवरील गस्त आणखी वाढवावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.
मंत्री श्री. देशमुख आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात जिल्हा प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले, धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील सर्व रस्त्यांवर गस्त वाढवावी. आवश्यक तेथे वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करावा. अफवा पसरविणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनीही पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.