
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे बाजार समिती खरेदी-विक्री व्यवहार काही दिवसांकरता बंद
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ): कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पुढील धोका टळावा या करीता पुढील काही दिवस बाजार समिती खरेदी-विक्री दैनंदिन व्यवहार बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.बाजार समितीला ही याचा मोठा फटका बसणार आहे.
देशात लॉक डाऊन परिस्थिती असताना ही शहरातील नागरिकांना भाजी पाला योग्य दरात मिळावा याकरिता पारोळा रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पहाटेच्या वेळी खरेदी-विक्री व्यवहार दैनंदिन पध्दतीने सुरूच होता.परंतू या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या वाहनांवर र्निजंतूक फवारणी केली जाते नव्हती.लिलाव वेळी आवारात गर्दी होत होती.सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याने सॅनेटायझरचा अभाव होता.हॅन्डगोल्ज वापर नाही,माक्सचा वापर होत नसल्याने नागरीक नियमांचे पालन करत नाही.
बाजार समिती वतीने आवारात दैनंदिन खरेदी-विक्री व्यवहार काही दिवसांकरीता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे नागरिकांना भाजी पाला मिळणे कठीण होईल. व्यापारी वर्गाने बंदला प्रतिसाद दिला आहे. बाजार समितीत आवारात काही दिवस शुकशुकाट राहणार आहे.असे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.कोणीही बाजार समिती आवारात खरेदी- विक्री साठी येऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे.