
धुळे: कंटेनमेंट झोन मधील सीमा बंदिस्त साठी अधिकारी ,कर्मचारी यांना बैठकीत मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): आज सायंकाळी सहा वाजता भारतरत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहांमध्ये मायक्रो कंटेनमेंट (१३)करिता नेमणूक केलेले नियंत्रण अधिकारी व पर्यवेक्षक तसेच युपीएचसी व मोबाईल टीम मधील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मायक्रो कंटेनमेंट झोनमधील कामाचे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती
यात कंटेनमेंट झोनमधील सीमा बंदिस्त करणे तसेच प्रत्येक घरनिहाय सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी करणे प्रत्येक नागरिकांची माहिती घेऊन दैनंदिन अहवाल सादर करणे उपलब्ध कर्मचारी पथकामार्फत नेमून दिलेल्या घर निहाय व्यक्तींची 14 दिवस दैनंदिन माहिती घेणे तसेच पर्यवेक्षक व नियंत्रण अधिकारी यांनी याबाबत नियोजन करून सर्वेक्षणात व नियोजनात कोणतीही उणीव राहू नये यावर दक्षता घेण्याबाबत संबंधितांना आदेशित करण्यात आलेले आहे या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री गणेश गिरी उपायुक्त श्री शांताराम गोसावी सहाय्यक आयुक्त श्री तुषार नेरकर आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मोरे यांनी बैठकीत संबंधितांना मार्गदर्शन केले
बैठकीत सर्व नियंत्रण अधिकारी पर्यवेक्षक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते