धुळे: नगरहुन मोटर सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला केले गजाआड.

Featured धुळे
Share This:

धुळे: नगरहुन मोटर सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला केले गजाआड.

धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): आय एस ओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलिसांची कामगिरी नगरहून मोटरसायकल चोरी करून नेणाऱ्या चोरट्याला केले गजाआड. धुळे शहरातील उपनगर मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीतील आय समान अंतर मोडी पोलीस स्टेशन कामगिरी नगरहून तीन मोटरसायकल चोरी करून घेऊन जाणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी गजाआड दोन फरार ती मोटरसायकल हस्तगत केल्या.
 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दि. २३ .पहाटे नगर जिल्हयातील श्रीरामपुर शहर मधुन एम एच १७ सी जे ३९४४,एम एच १७ ए जी १८८५, एम एच १७ बी जी ४८०४ अशा तीन मोटार सायकल चोरी करुन  मुंबई-आग्रा महामार्ग क्रं ३ ने चोरटे मार्गस्त झाल्याची माहिती धुळे जिल्हयातील सगळ्या पोलीस स्टेशनला कळवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि विलास एन ठाकरे नी आपल्या शोध पथकातील कर्मचारी सह लळींग टोल नाका येथे लळींग गावा कडुन धुळे शहरात जाणाऱ्या महामार्गावार
नाकाबंदी लावुन येणाऱ्या मोटरसायकल  ची कसुन चेकींग सुरु असतांना काही अंतरा वरुन महामार्गावर तीन मोटरसायकलवरून जोरदार वेगाने येतांना दिसले पण पुढे पोलीस बंदोबस्त असल्याचे मोटारसायकलस्वार चोर यांनी दुरुनच पोलीसांना पाहुन  त्यांनी टोल नाक्याच्या विरुध्द दिशेने पळ काढला त्याच वेळेस संबंधीत पोलीस पथकाने  त्यांचा पाठला सुरु केला. काही वेळ महामार्गावर चोर-पोलिस खेळ सुरू होता. मोटरसायकल चोरट्यांनी  वरखेडी शिवारात कचरा डेपो जवळ आपले वाहन सोडुन पळ काढला. पोलिसाला चोरट्यांना कसे पकडावे प्रश्नच पडला पोलिसांनी गावातील काही नागरिकांना विचारपूस केली मोटरसायकलवर पळून जाताना दिसले का परंतु काहीच माहिती मिळत होती या दरम्यान पोलीस त्यांचा शोध सुरू होता त्याच वेळी मक्याच्या शेतात एक चोरटा पोलीसांना पळतांना दिसला.त्यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले व मोहाडी नगर पोलीस स्टेशनला आणून त्याला पोलीसी खाक्या दाखवला असता त्यानें त्याचे नाव गांव विचारले असता त्यांने त्याचे नाव कलम ठोबु भुरीर्या रा.काकडवा तहसील कक्षी जि.धार मध्यप्रदेश असे सांगितले तसेच अन्य साथीदारां बाबत विचारपुस केली असता आपले सोबत मंगलसिंग ठाकु अजनार रा.काकडवा तहसील कुक्षी जि.धार मध्यप्रदेश ,हकम किया॑ भुरीर्या ,भल्ला पुर्ण नाव माहित नाही असे नाव सांगुन त्यांचे कडेस होंडा कंपनी ची शाईन तसेच पॅशन प्रो अशा मोटरसायकलची चोरी करुन मध्यप्रदेश येथे घेवुन जात असल्याची कबुली दिली. असुन सोबतचे साथीदार हे माझ्या मागे पोलीस लागल्याचे पाहुन दिवानमळा जवळील कट मधुन धुळे कडुन मोलगांव कडे जाणाऱ्या रस्त्याने पळुन गेले तसेच श्रीरामपुर शहर पोस्टेला गुरनं १०९/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर एका चोरट्यास पकडून मोहाडी पोलिसांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी यांना पुढील कारवाई करीता ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ विलास एन ठाकरे, शोध पथकातील
हेका/प्रभाकर ब्राम्हणे, पोशि/गणेश भामरे,जितेंद्र वाघ,सचिन वाघ, दिपक महाले, कांतीलाल शिरसाठ, दारासिंग पावरा, जयेश चौधरी आदींनी ही कारवाई केली.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *