धुळे: 3 जण कोरोना मुक्तशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिला डिस्चार्ज

Featured धुळे
Share This:

धुळे: 3 जण कोरोना मुक्तशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिला डिस्चार्ज

धुळे (तेज समाचार डेस्क): कोरोना विषाणूवर (COVID 19) मात करीत धुळे जिल्ह्यातील आणखी तीन रुग्ण आज सायंकाळी आपापल्या घरी परतले. त्यात शिरपूर तालुक्यातील दोन महिलांसह साक्री येथील पुरुषाचा समावेश आहे. या रुग्णांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 34 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी आतापर्यंत 11 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.

या विभागात दाखल तीन रुग्णांना 14 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची काल व आज कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे अहवाल आज निगेटिव्ह आले. त्यामुळे या तीन जणांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, डॉ. नीता हटकर, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, महसूल

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *