
धुळे : शहरात आढळले 3 करोना पॉझिटिव्ह – रुग्णसंख्या 24
धुळे (तेज समाचार डेस्क) : धुळे जिल्ह्यात करोना हळूहळू आपले पाय पसरवत असून जिल्ह्यातील करोना बधितांची संख्या २४ वर गेली आहे. शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतच असुन शनिवारी रात्री आनखी 3 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ आताच प्राप्त झालेल्या अहवालावरून धुळे शहरातील तिघांना करोनाची बाधा झाली आहे. धुळे जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण साक्री तालुक्यात सापडला होता. धुळे जिल्हा रेड झोन मध्ये गेला असून रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसागणिक वाढणारी करोनाग्रस्तांची संख्या चिंतेत भर टाकणारी अशीच आहे. दरम्यान धुळ्यातील कॉविड ( covid ) रुग्णालयात तिघे करोनाबाधितांवर उपचार सुरू असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.