
धुळे: जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या 27
धुळे: जिल्ह्यात आणखी 2 रुग्ण करोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या २७
धुळे (तेज समाचार डेस्क) : धुळे जिल्ह्यात ही करोनाबाधितांची संख्या २७ वर पोहचली असून ६ जणांचा यात मृत्यू झाला आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दोन रुग्णांचे करोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिंदखेडा तालुक्यातील २८ वर्षीय तरुणाचा, तर धुळे शहरातील १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे, जिल्हा प्रशासनाने अशी माहिती दिली आहे.दरम्यान काल (दि.२९) श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल ७५ वर्षीय महिलेचा रात्री मृत्यू झाला. ही महिला करोना विषाणूची पॉझिटिव्ह रुग्ण होती. करोनााधितांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी घरातच थांबावे स्वतःची काळजी घ्यावी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.