
धुळे: 18 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह- रूग्णसंख्या 53
धुळे: 18 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह- रूग्णसंख्या 53
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): जिल्ह्यात करोनाचा धोका वाढत असून शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार १८ रूग्णांचे करोना विषाणूचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. अचानक १८ रूग्ण वाढल्याने जिल्ह्यातील रूग्णसंख्या ५३ वर पोहचली आहे.
धुळ्यात शुक्रवारी रात्री उशिरा तब्बल १८ रुग्णांचे अहवाल कारोना पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांमध्ये धुळे शहरातील १७ रुग्णांचा समावेश आहे. एसआरपीएफ च्या ७ जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गुरुवारी देवपूर परिसरातील पॉझिटिव्ह आढळलेल्या डॉक्टरच्या संपर्कातील ४ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या १८ रुग्णांमध्ये १४ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्या आता ५३ झाली असून यात ६ जणांचा मृत्यू तर १४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.