
धुळे: टॅकर अपघातात 1 महिला ठार 1 जखमी
नेर गावाजवळ सुरत नागपूर महामार्गावर भिषण अपघात एक महिला जागीच ठार एक जखमी
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि ): देशात लॉक डाऊन चार दुसरा टप्पा सुरू आहे.यात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहे.आज शनिवारी दुपारच्या वेळी सुरत नागपूर महामार्गावरील नेर गावाजवळ सुरतहून जळगाव कडे जाणारा गॅस टॅंकर हा चालकाचा टॅकर वरील ताबा सुटल्याने महामार्गावर जोरदार पणे आदळला व उलटला व रस्त्यावर पुर्णपणे आडवा झाला.यात कॅबिंन मध्ये बसलेली महिला रस्त्यावर फेकली गेली व जागीच ठार झाली.लॉक डाऊन मुळे महामार्गावर रस्त्यावर अन्य वाहनाची वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
या अपघात एक ठार एक व्यक्ती जखमी झाला.त्याला तातडीने लोकांच्या मदतीने उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.मयत महिलेची ओळख पटलेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामिण उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.महामार्गावर यावेळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.क्रेनच्या मदतीने सायंकाळी टॅकर हटविण्यात आला.वाहतूक सुरळीत करण्यात आली.
साक्री पोलीस ठाण्यात अपघात बाबत उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.