राज्यातील 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे डिजी लोन प्रलंबित

Featured जळगाव
Share This:

पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगांव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे याच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

यावल (सुरेश पाटील). 1 वर्षांपासून महाराष्ट्रातील सुमारे 3 हजार पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे प्रलंबित असलेले DG लोन तात्काळ देण्यात यावे या मागणीचे निवेदन आज दिनांक 21/8/2020रोजी पोलीस बॉईज असोसिएशन शाखा जळगाव जिल्हा यांचे वतीने जिल्हाधिकारी जळगांव यांचे मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे जळगांव जिल्हाध्यक्ष नितीन ब्राम्हणे,जिल्हा उपाध्यक्ष-मगलसिंग राजपूत जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील,जळगांव महानगर अध्यक्ष- किरण राजपूत, भुसावळ तालुका अध्यक्ष दिनेश परदेशी, चोपडा तालुका अध्यक्ष मुन्ना ठाकूर,पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख,चाळीसगाव तालुका अध्यक्ष निखिल सोनावणे, इंजी अभयराजे शिंदे, अक्षय वडनेरे,हर्षल तावडे,कुंदन शिरूड,केतन चौधरी,आकाश काटे व पदाधिकारी उपस्थित होते

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *