अँड.देवकांत बाजीराव पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेवर जळगांव जिल्हाअध्यक्ष म्हणून नियुक्ती

Featured जळगाव
Share This:

अँड.देवकांत बाजीराव पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेवर जळगांव जिल्हाअध्यक्ष म्हणून नियुक्ती

 

यावल यावल  ( सुरेश पाटील ) : भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रितेश राठोड व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोहर चौधरी यांच्याआदेशानुसार प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते यावल तालुक्यातील विरावली येथील अँड. देवकांत बाजीराव पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन यांची जळगांव जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अँड.पाटील हे मागील 8 ते 10 वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत आहे. रक्त तपासणी शिबिरे, रक्तदान, नेत्रदान शिबिरे, बेटी बचाव बेटी पढ़ाव, वृक्ष लागवड करणे, सुशिक्षित बेरोजगारासाठी मेळावे घेणे, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेणे, अलीकडच्या काळात आँनलाईन वकृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करणे असे विद्यार्थी ,युवक ,महिला सर्वच स्तरावर संस्थेच्या माध्यमातून त्याचे काम असते. यांचीच दखल घेऊन गेल्या वर्षाचा “समाज भूषण ” पुरस्कार भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने यावल तहसिलदार साहेबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यांचीच दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष विकी राजपुत यांनी अँड . देवकांत बाजीराव पाटील यांची निवड केली आहे.
पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचचे संस्थापक अध्यक्ष असुन गेल्या 3 ते 4 वर्षापासुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्य करत आहे.

जिल्हाध्यक्ष म्हणून मिळालेल्या जबाबदारीचे संधी म्हणून सोनं करुन जिथे -जिथे मानवाधिकाररांचे उलंघन होऊन तिथे अन्याय होईल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू. व मानवाधिकार बरोबरच त्यांचे संरक्षण करुन या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले.

पाटील यांच्या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष विकी राजपूत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोहर चौधरी परिषदे चे उप प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद पाटील , मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड सतीष ताके यांचे सह पाटील यांचे निवडीबद्दल , परिषदेच्या संघटनेचे कडून , मित्र परिवार, तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

Chaddha Classes

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *