पंतप्रधान नरेंद्र मोदीचे वाढदिवसाचे औचित्य साधून देवेन्द्र फडणवीस यांची व्हर्च्युअल सभा आज

Featured नंदुरबार
Share This:

 नंदुरबार ( वैभव करवंदकर) . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध सेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री भाऊ तोरसेकरजी यांची व्हार्चुअल व्हिडिओ कॉन्फरन्स (Virtual Meeting ) सभा दिनांक 18 सप्टेंबर 2020 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार असून या सभेसाठी प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात जी लोढा, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री श्रीकांत जी भारती हे उपस्थित राहणार आहे.

वर्चुअल रॅलीची फेसबूक लिंक (bit.ly/18VRMaha_FB), युट्युब लिंक (bit.ly/18VRMaha), व्हाट्सएपच्या द्वारे प्रसारीत करण्यात आली असून भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील पारदर्शक प्रशासक आत्मनिर्भर भारताचे नेते नरेंद्र मोदी साहेब यांच्याविषयी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रभावी विचार जरूर ऐकावे अशी विनंती नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *