
अक्कलपाडा धरणातील पाणी पांजरा पात्रात सोडावे याकरता शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) : अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा नदीपात्रात सोडण्यात यावे याकरता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
उन्हाळ्याची चाहूल लागताच काही गावांमध्ये पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांना शेतातील पिकांना व जनावरांना देण्यासाठी पाणी नाही. अक्कलपाडा धरणातून आवर्तन नदीपात्रात सोडले तर पाण्याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेती उपयुक्त जमिनीला येऊ शकतो. जळगाव जिल्हा झाली गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा पात्रात सोडून ते पाणी भिलाली गावातील शेतकरी व नागरिकांना मिळावे याकरता ठरावही पारित केला आहे.
याच करता जिल्हाधिकारी कार्यालय घाट्यात भिलाली गावातील ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना लेखी निवेदन सादर केले अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा पात्रात सोडण्यात यावे.अन्य गावातील पाणीप्रश्न व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल पिकांना पाणी देता येईल याबाबत यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले व पाणी सोडण्याबाबत साकडे घातले. अन्यथा मोठे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनवासी यांनाही पाणीटंचाईबाबत दिलेले ग्रामस्थांनी निवेदन दिले. यावेळी रावसाहेब पाटील, भटु माळी, सुनिल पवार ,नाना पवार, सुनील निकम जयसिंग गिरासे, अविनाश पाटील, गंगाराम गिरासे, कैलास पाटील मधुकर पाटील, भास्कर पाटील, घनश्याम पाटील अन्य शेतकरी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.