न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याची मागणी

Featured जळगाव
Share This:

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी निर्णयानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याची मागणी.

हिंदू जनजागृती समितीचे निवेदन.

यावल (सुरेश पाटील): प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी च्या निर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत हिंदू जनजागृती समिती तर्फे जिल्हाधिकारी जळगाव,तहसीलदार यावल व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेक जण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात, मात्र हेच कागदी प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर कचऱ्यात,गटारीत इत्यादी ठिकाणी पडलेले आढळतात,प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट होत नाहीत त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते राष्ट्रध्वजाची अशाप्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका(103/ 2011) दाखल केली होती, याविषयी सुनाववणी करताना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृह विभाग तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रक काढले नुकताच महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे त्यानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणे हे कायदाबाह्य ठरते.
बंद दुकानातून तसेच ऑनलाईन पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील मास्क विक्री होत असल्याने सुद्धा आढळून आले आहे,तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही, तिरंगा मास्क हे देश प्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही तर ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे हा ध्वजाचा अवमानच आहे,तसेच राष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियम1971चे उल्लंघन आहे,त्यामुळे तिरंगा मास्कची विक्री तसेच वापर करणाऱ्यांना शासन करावे अशी सुद्धा मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
उच्च न्यायालयाने विशेषता शासनाला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये सामाजिक संस्थांना सामावून घ्यावे असेही आदेश दिले आहेत,यामध्ये प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करणे अभिप्रेत आहे.( उदाहरणार्थ पत्रके, फलक,विज्ञापने याद्वारे प्रबोधन) समिती गेल्या 19 वर्षांपासून राष्ट्रध्वजाच्या अवमानाचाच्या विरोधात राष्ट्र कर्तव्य म्हणून प्रबोधन करीत आहे.समितीद्वारे शाळा-महाविद्यालयात व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे,हस्तपत्रके वितरित करणे,भिंती पत्रके-फ्लेस्क लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर ध्वनि चकत्या(सीडी)दाखवणे,रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, सामाजिक संकेतस्थळाद्वारे मोहीम राबवणे आदी कृती आदी उपक्रम राबविण्यात येतात.
या संदर्भात हिंदू जनजागृती समितीतर्फे मागण्या खालील प्रमाणे आहेत, 1)शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रबोधन करणारी कृती समिती स्थापन करावी त्यामध्ये हिंदू जनजागृती समितीचा ही समावेश करावा अशी विनंती आहे, समिती या राष्ट्र सेवेस तत्पर आहे यापूर्वी(भिवंडी आणि जळगाव या ठिकाणी अशी कृती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये समितीच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेतले आहे) 2) जिल्ह्यात कुठेही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन आणि त्याची विक्री होते का?याची खात्री करावी असे होत असल्यास संबंधित उत्पादकावर त्वरित कार्यवाही करावी.3) जेथे शक्य आहे तेथे समितीला शाळातून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या विषयावर व्याख्यान आणि प्रश्नमंजुषा घेण्यास अनुमती द्यावी. 4)नागरिकांचे प्रबोधन व्हावे यासाठी समितीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा ही विशेष चित्रफित बनविली आहे ही चित्रफीत केबल वाहिन्यांना दाखवण्यास अनुमती द्यावी ही विनंती.
अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीतर्फे यावल तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जळगाव यांना आज दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी समितीच्या सदस्यांनी दिले तरी यावल तहसीलदार यावल पोलीस याबाबत ठोस निर्णय काय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *