बगिच्याला सहारा किंवा इंदिरा गार्डन नाव देण्याची मागणी- यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन

Featured जळगाव
Share This:

तिरुपतीनगर व गणपती नगरमधील गार्डन स्त्री–पुरुष दोघांसाठी करून
बगिच्याला सहारा किंवा इंदिरा गार्डन नाव देण्याची मागणी.

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन.

यावल ( सुरेश पाटील): यावल शहरातील तिरुपतीनगर आणि गणपतीनगर यांच्या संयुक्त खुल्या जागेवर फक्त महिला गार्डन म्हणून काम सुरू आहे हे गार्डन सार्वजनिक पुरुष व महिलांसाठी करण्याची तसेच या गार्डनला/बगिच्याला सहारा किंवा इंदिरा गार्डन म्हणून असे नाव देण्यात यावे अशी लेखी मागणी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
दिनांक 19 मार्च 2021 शुक्रवार रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात गणपतीनगर व तिरुपतीनगर मधील नागरिकांनी म्हटले आहे की गट क्र. 754 मध्ये खुल्या जागेत बांधकाम सुरू असलेले महिला गार्डनला सार्वजनिक पुरुष व महिलांसाठी करणे आणि याच खुल्या जागेवर मुस्लिम समाज हॉल शादी हॉल करून देणेबाबत,या खुल्या जागेवर ज्या ठिकाणी पाण्याचा फवारा/कारंजा केलेल्या आहे त्या बाजूला एक मोठा हायमस्ट लाईट लावा.गार्डन/बगीच्या याचे नाव सहारा किंवा इंदिरा गार्डन असावे,गट क्र.754 मध्ये रोड टच ओपन स्पेस आहे तरी या ठिकाणी जागेत गेल्या5ते6 महिने पासून महिला गार्डन चे काम सुरू आहे तरी आपणास विनंती आहे की महिला गार्डनला बदलून सर्वांसाठी करावे म्हणजे पुरुष महिला लहान बालके सर्वांना त्याचा वापर करता येईल.
या गार्डन/बगीच्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे,गार्डन सुरू होण्याआधीच आपण सदरील गार्डन सर्वांसाठी खुले करावे आणि या ठिकाणी4500ते5000 स्क्वेअर फुट मध्ये एक समाज हॉल मुस्लिम बांधवांसाठी करून द्यावा.या गार्डन मध्ये होणारे मुस्लिम लग्न समाज हॉलची संपूर्ण जबाबदारी व देखभाल नोंदणीकृत शैक्षणिक संस्था कार्तल एज्युकेशन अण्ड वेल्फेअर सोसायटी करेल असे सुद्धा महत्वाची टीप अर्जदार मोहम्मद अशपाक शहा, मोहम्मद ताहीर मोहम्मद अशरफ कुरेशी,अश्फाक शहा गफ्फार शहा,युनिस खान हुसेन खान,रमजान बिराम तडवी,शेख इस्माईल शेख मोहम्मद,शरीफ ईसा पटेल,सालिया अजहरद्दीन,ईसाक टेलर,मुक्तार ईसा पटेल,जलील सर यांच्यासह इतर 22 जणांनी आपली स्वाक्षरी करून यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे तरी मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधी याबाबत काय निर्णय घेतात? याकडे आता संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *