ओला व सुका कचरा सोबत माती शिवसेनेकडून चौकशीची मागणी

Featured जळगाव
Share This:

ओला व सुका कचरा सोबत माती शिवसेनेकडून चौकशीची मागणी

यावल ( सुरेश पाटील ): यावल नगर परिषद मार्फत शहरातील ओला व सुका कचरा जो संकलन करण्यात येतो त्यासोबत संबंधित ठेकेदार ठीक- ठिकाणांची माती सुद्धा उचलत असून ठेकेदाराने आता प्रयन्त किती टन ओला व सुका कचरा उचल केला आहे याबाबतची चौकशी करण्यात यावी असे लेखी निवेदन यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे यावल शहर शिवसेनेने दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल शहरातून आता पर्यंत किती टन ओला व सुका कचऱ्याचे संकलन करण्यात आले या घनकचऱ्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी माती उचलण्यात येऊन त्याचे वजन वाढविण्यात आल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे त्याचप्रमाणे या घनकचऱ्याचा माध्यमातून किती उत्पन्न नगरपालिकेस मिळाले यामध्ये जो कोणी ठेकेदार आहे त्याची मनमानी सुरू आहे का ?
यावल शहरातून आतापर्यंत किती ओला आणि सुका कचरा संकलित करण्यात येऊन त्यापासून तयार होणाऱ्या कंपोस्ट खत किती विक्रीतून किती फायदा नगरपालिकेस झाला? कोणत्या ठिकाणी हे संकलन व विक्री झाली या सर्व बाबीबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व यात अनियमितपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारास देय अदा करण्यात येऊ नये, बिल काढण्यात येऊ नये अशी विनंती आम्ही शिवसैनिक करीत आहोत निवेदनावर यावल शहर शिवसेना प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर प्रमुख सागर देवांग, आदिवासी सेना तालुका संघटक हुसेन तडवी, युवा सेना सरचिटणीस विजय पंडित, युवासेना उपशहर प्रमुख पिंटू कुंभार, सुरेश कुंभार, विभाग प्रमुख योगेश राजपूत इत्यादी शिवसेना पदाधिकारी यांची स्वाक्षरी आहे निवेदनाची प्रत पालक मंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्या माहितीसाठी सुद्धा दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *