
शिरपूर : भाजप ने साजरी केली दीनदयाळ उपाध्याय ची जयंती
शिरपूर (मनोज भावसार). जनता पार्टी शिरपूर शहर कार्यालयत भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत अत्यंत मोलाचे योगदान देणारे व्यक्तिमत्व, एकात्ममानव वादाचे प्रणेते, थोर विचारवंत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आ. काशिराम पावरा व भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
याप्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी म्हणाले कि प्रखर देशभक्त, कुशल संघटक, अंत्योदयाचे प्रणेते आणि एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडणारे थोर विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांची आज (दि.२५ सप्टेंबर) रोजी जयंती. आपल्या उत्तम संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे कार्य केले. संघाकडून त्यांनी राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेतली.
भारतीय जनसंघ म्हणजे आजच्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. ते एक शिक्षणतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ देखील होते. आपल्या लेखणीद्वारे त्यांनी राष्ट्रधर्म प्रकाशन संस्थेची स्थापना करून मासिक पत्रिका सुरू केली होती. समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे एकच ध्येय त्यांनी समोर ठेवले होते. मात्र १९६८ साली त्यांच्यावर काळाचा घात झाला होता. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून अटल बिहारी वाजपेयी जी ढसाढसा रडले होते.
संपूर्ण भारत देशाला आपले कुटुंब मानणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन करतो असे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, चिटणीस चंद्रकांत पाटील, एन. डी. पाटील, संजय आसापुरे, भरत पाटील, महेंद्र पाटील, रोहित शेटे, सुनिल पाटील, सुनिल चौधरी, राधेश्याम भोई, बापु लोहार, मुकेश पाटील, प्रशांत चौधरी, मुबीन शेख, विक्की चौधरी, मंगेश भदाणे, रफीक शेख, अविनाश शिंपी, जगन्नाथ पाटील, अजिंक्य शिरसाठ, राजुलाल मारवाडी, प्रमोद पाटील, किरण चौधरी, राजेंद्र शिंपी पक्षाचे पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.