चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करा! केरळ चे धर्तीवर पाले भाज्यांचे हमीदर ध्या

Featured जळगाव
Share This:

चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करा! केरळ चे धर्तीवर पाले भाज्यांचे हमीदर ध्या… भाकप

चोपडा   (तेज समाचार डेस्क):  चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करून हल्ली सर्वत्र पालेभाज्या फळभाज्या ची चाललेली परवड पाहता केरळ सरकारच्या धर्तीवर त्यांचे किमान हमी भाव बांधून ध्या अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभा लाल बावटा शेतमजूर युनियनने त्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे त्याबाबत सविस्तर निवेदन चोपडा तहसील दार यांना सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की,
चोपडा तालुक्यात यावर्षी पावसाळा जेमतेम असून शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या दोनदा मोडकळीस आलेल्या आहेत सर्व खर्च वाया गेला आहे .उर्वरित पिके करपा धरत असून त्यांची वाढ खुंटलेली आहे एक महीनेपसून पाऊसाचा थांग पत्ता नाही तरी .महाराष्ट्र सरकारने म्हणून त्वरित कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा शेतकऱ्यांना दर एकरी 10000रु मदत द्यावी
चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात करावा .मजुरांना एमआरजीएस खाली रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. आणि .शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच केळीचा भाव बोर्डाच्या प्रमाणे देण्यात यावा. शेतकऱ्यांना दुष्काळ व कोवीड काळात दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या. श्रावण बाळ इंदिरा गांधी संजय गांधी आदी योजनांचे रखडलेले 2महिन्यांचे मानधन ध्या. घोडगाव रस्त्यावरील झुडपे तोडण्यात यावीत तसेच एसटी वाहतूक पूर्ववत चालू करा वढोडा टपाल कॉलेज गाडी पूर्व वत सुरू क रा.चाऱ्याची परिस्थिती पाहता चारा छावण्यांचे नियोजन करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे भारतीय. कम्युनिस्ट पक्षाचे नेते का अमृत महाजन का शांताराम पाटील गणेश धनगर संतोष कुंभार विश्वास शंकर धनगर निंबाजी बोरसे एम जी धनगर आदींचा शिष्ट मंडळात समावेश होता या मागण्यांवर कार्यवाही न केल्यास भाकप
किसान सभा तरफे शेतकऱ्यांचे आंदोलन छेडले जाईल असाही इशारा लेखी निवेदनात देण्यात आला आहे .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *