
साक्री येथील वृद्धाचाकोरोना विषाणूमुळे मृत्यू
धुळे (तेज समाचार डेस्क) : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे दाखल साक्री येथील 80 वर्षीय वृद्धाचे आज पहाटे निधन झाले. त्यांचा कोरोना विषाणू चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच या व्यक्तीला हृदय विकाराचाही त्रास होता, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.