शिंदखेडा : तापी पाईपलाईन जवळ आढळला मृत हरीण

धुळे
Share This:
शिंदखेडा (तेज समाचार प्रतिनिधि). शिंदखेडा तालुक्यातील बाबळे फाट्याजवळील महानगरपालिकेच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइन जवळ सकाळी हरीण मृतावस्थेत आढळले.
या भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने वनविभागाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे.वन्यजीव शोधात भटकंती करत महामार्गावर येऊन जातो आणि वा मार्गाच्या धडकेत या वनी जीवन मृत्यू होतो विभागाने या भागात कृत्रिम पाणवठे तयार करायला पाहिजे परंतु वन विभाग या गोष्टींकडे दुर्लक्ष करते क्षेत्राला बंदी केली पाहिजे या इकडे वनविभाग गांभीर्याने लक्ष देत नाही या अगोदरही वाहनाच्या धडकेत नीलगाय व हरण ठार झाले आहेत.वनविभाग वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलीही पावले उचलताना दिसत नाही वनविभाग वन्यजीवांचे हाल करू पाहते का असा सवाल आता कापडणे व न्याहळोद परिसरातील ग्रामस्थ करत आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन या समस्या सोडवायला पाहिजे. मृत हरीण बाबत परिसरातील नागरिकांनी वनविभाग अधिकारी यांना माहिती दिली माहिती मिळताच अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून शासकीय सोपस्कार परभणीत हरणाची विल्हेवाट लावण्यात आली.यावेळी परिसरातील पदाधिकारी ,सरपंच नागरिक उपस्थित होते.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *