दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

Featured मुंबई
Share This:

अंगारकी निमित्त मंदिरात केलेल्या आरासी चे थ्री डी स्कॅनिंग केले व ते भक्तांना त्यांच्या मोबाईल वर उपल्बध करून दिले. यामुळे भक्तांना घरबसल्या अगदी थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा व्हर्च्युअल अनुभव घेता आला. मंगळवारी सकाळी ही लिंक व्हॉट्सअप वरून तुफान व्हायरल झाली. जगभरातील जवळपास लाखहुन अधिक भाविकांनी अगदी प्रत्यक्ष दर्शनासारख्या दर्शनाचा लाभ घेतला.

दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट चे व हे तंत्रज्ञान बनवणाऱ्या पुण्यातील व्हर्चुअल रिऍलिटी क्षेत्रातील नामवंत डिजिटल आर्ट व्हीआरई संस्थेचे सर्वत्र कौतुक होत असून असंख्य भक्तांनी सोशल मीडियावर त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, सध्याच्या कठीण कोविड काळात अशा तंत्रज्ञानाची गरज असल्याचं मत अनेकांनी मांडलं. गणोशोत्सवात वेगवेगळ्या मंडळांनी देखील या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन व्हर्च्युअल दर्शनाची सोय केल्यास भक्तांना आनंद होईल अशाही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *