दाेंडाईचा: के. डी. जमादार यांचे निधन

नंदुरबार
Share This:

दाेंडाईचा (तेज समाचार प्रतिनिधी) : येथील किसनसिंग धर्मा जमादार उर्फ के. डी. जमादार (वय ५७ वर्ष) थाळनेर ता. शिरपुर ह.मु.काेठारी पार्क दाेंडाईचा जि. धुळे यांचे दि. २७/०३/२१ राेजी रात्री ११:५५ वाजता कल्याण येथील वैैैैभव हाॅस्पिटल येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अत्यंयात्रा शासकीय नियम पाळत आज दि. २८ राेजी सकाळी कल्याण येथे पार पडली.
दाेंडाईचा येथील युनिक शुगर लिमिटेड येथे पर्सेनल मॅनेजर म्हणून त्यांनी अनेक वर्ष सेवा दिली. तर आता दाेंडाईचा येथील उद्याेजक रिषीकेश रावल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पहात हाेते. रावल परिवाराचे अत्यंत विश्वासू अधिकारी म्हणून त्यांची आेळख हाेती. अत्यंत मितभाषी, नेहमी मदतीसाठी तयारी, सुख दु:खात नेहमी पाठीशी उभी रहाण्याची भुमिका यामुळे त्यांनी कामगार कर्मचारी बांधवांच्या ह्दयात स्थान निर्माण केले हाेते. एकवचनी स्वभाव तर लहान पणापासुन संघर्षमय जिवन तर आयुष्यात अनेक संकटे पेलत त्यांनी आपला संसाराचा गाडा चालविला हाेता. अशात त्यांचे अचानक जाण्याने त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कंपनीत अनेक नवयुवकांना त्यांनी एच. आर. विभागाचे काम शिकविले. अनेकांचे जिवनाला गुरू म्हणुन दिशा दिली हाेती. नेहमी लाेकांना चालना देण्यासाठी त्यांचे एक पाऊल पुढे असे त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुली, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. श्री. मनाेज किसनसिंग जमादार यांचे ते वडील हाेत. रावल उद्याेग समुहातील कामगार व कर्मचारी बांधव यांनी देखील त्यांच्या दु:खात सहभागी हाेत. मृत आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *