
यावल मध्ये वाळू माफियांची दादागिरी, प्रांताधिकारीच्या शासकीय वाहनाला डंपर ने दिली धडक
यावल (सुरेश पाटील). उपविभागीय दंडाधिकारी फैजपूर उपविभाग फैजपूर कैलास कडलक यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.24 रोजी रात्री23वाजेच्या दरम्यान न्हावी गावाचे गावठाण शिवारात ग्रामीण रुग्णालयाचे समोरील कॉलनीत पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड डंपर एमएच19झेड4749 या डंपरने चोरीची रेती वाहतूक करताना डंपरला पकडले असता त्यावरील चालक महेंद्र धनराज तायडे याने मला व माझे वाहन चालकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे ताब्यातील डंपर आमचे शासकीय वाहनावर धडकवून आम्ही करत असलेले शासकीय कामात अडथळा निर्माण करून डंपर चालक महेंद्र धनराज तायडे रा.कोळन्हावी ता. यावल व त्याचे सोबतचे अर्जुन बाविस्कर रा.पुनगाव ता.चोपडा व चंद्रकांत सोळुंके रा.कोळन्हावी ता.यावल तसेच एक्स.यु.व्ही.500 गाड़ी क्र.एमएच19बीएल1010 वरील चालक ज्ञानेश्वर नामदेव कोळी राहणार कोळन्हावी ता.यावल यांनी साथ दिल्याने तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी यांचेकडील दि.22/2/2021 अन्वये जारी केलेल्या संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून सदर अशोक लेलँड डंपर एमएच19झेड4749 वरील चालक महेंद्र धनराज तायडे व त्यांचे सोबतचे वरील साथीदार यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद देत आहे असे दिलेल्या फिर्यादीत प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी म्हटले आहे.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियाचा पाठलाग करताना फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या शासकीय वाहनाला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना काल दिनांक 24 बुधवार रोजी रात्री उशिरा यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळ घडली. तालुक्यातील काही सर्कल तलाठी यांचे वाळूमाफियांची अर्थपूर्ण संबंध असल्यानेच अवैध अनधिकृत वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे. वाळू माफिया च्या दादागिरीच्या या घटनेत फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्या शासकीय वाहनाचा जीप चालक सुद्धा जखमी झाल्याचे समजले असून शासकीय गाडीचे नुकसान झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त खबर मिळाल्याने त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून चालकासह एका वाळू डंपरचा पाठलाग यावल किनगाव दरम्यान केला मात्र अंधाराचा फायदा घेत वाळू डंपर किनगाव भागात पळून जाण्यात यशस्वी झाला तेथून परत येताना प्रांताधिकारी यांना न्हावी गावाजवळ एक वाळू वाहतूक करणारा डंपर दिसला,त्यांनी या डंपरचा पाठलाग केला असता डंपर सुसाट वेगाने न्हावी गावातील अरुंद रस्त्या असलेल्या गल्लीत शिरला तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डंपर चालकाने डंपर मागे घेतांना शासकीय वाहनाला पुढून जोरात धडक/ठोस देऊन गाडीचे मोठे नुकसान केले या घटनेत वाहनचालक यास केलेल्या ओढाताणीत वाळूमाफियांनी धक्काबुक्की सुद्धा केली असून त्यांना काही प्रमाणात मुक्का मार लागलेला आहे.
याप्रकरणात डंपरला संरक्षण देणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारसह डंपरला ताब्यात घेण्यात आले आहे सुसाट वेगाने डंपर चालवणाऱ्या तरुणाला सुद्धा फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
यावल तालुक्यात पूर्व पश्चिम विभागात फैजपुर आणि यावल येथे स्वतंत्र पोलीस कार्यालय आहेत यात पोलिसांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून आणि काही खाजगी दुकाने,प्रतिष्ठाना समोर असलेले यावल व फैजपूर शहरात प्रमुख ठिकाणी प्रमुख गावांमध्ये चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविले आहेत. कोणती वाहतूक कशी होत आहे हे सर्व काही पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून समजत असले तरी प्रत्यक्षात अवैध अनधिकृत धंद्यांवर प्रत्यक्ष पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
रात्रीच्या वेळेस आणि दिवसा नदी-नाल्यांच्या काठावर संबंधित तलाठी किंवा सर्कल पोलिसांच्या मदतीशिवाय गुंडगिरीविरुद्ध/वाळू माफियांवर कारवाई करू शकणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असल्याने फैजपूर उपविभागीय महसूल अधिकारी कैलास कडलग आणि उपविभाग पोलीस डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी संयुक्त मोहीम राबवून यावल रावेर तालुक्यातील वाळू माफियांचा बंदोबस्त करावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यावल व रावेर तालुका दोघं तहसीलदारांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी,तलाठी,कोतवाल, शिपाई यांच्यासह इतर संघटनांनी यावल रावेर तालुक्यातील वाळू माफियांवर कडक कारवाई करणे संदर्भात निवेदन देऊन प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या शासकीय वाहनावर वाळूचे डंपर धडकवून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून प्रांताधिकारी कैलास कडलक व त्यांचे वाहन चालक यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने वाळू माफियांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.