
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुसाणे गावात 119 किलो अफूची झाडे छापा टाकून जप्त केले- शेतकरी फरार
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दुसाणे गावात द्विदल पिकात 2,38,000 हजारांची 119किलो अफूची झाडे छापा टाकून जप्त केले. शेतकरी फरार.
धुळे (विजय डोंगरे) : तालुक्यातील साक्री येथील दुसाणे गावात शेतात अफुची शेती करत आहे.अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवार यांना खबर मिळाली सदर माहितीही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना देण्यात आली.
पोलीस निरीक्षक शिवाजी यांनी एक पोलीस पथक तयार करून दुसाणे गावातील एका शेतात द्विदल पीक घेणाऱ्या शेतकरीच्या शेतातील छापा टाकला व पाहाणी केली.यावेळी मका शेतात अफुचे पीक घेतले जात होते.तीन ते चार फूट उंच असलेल्या मका पीकात अफूचे पीक शेतात तयार करत असतानाचे निदर्शनास आले.यात फॉरेन्सिक एक्सपर्ट यांची मदत घेण्यात आली. त्याआधारे 2,38,000 रुपयांचे 119 किलो अफूची झाडे पान फुलासह जप्त करण्यात आले आहे.
सदर शेतमालक याचा तपास घेतला असता. शेतमालक मनोज दामू खैरनार हा शेतात पोलिसांनी कारवाई केल्याचे समजतात गावातून फरार झाला.
शेतकर्याने शेतात बंदी असतानाही महाराष्ट्र कायदा नियम उल्लंघन केले व अफुचे पीक बेकायदेशीर रित्या शेतात पीकवले. त्याच्याविरुद्ध साहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश शामराव बोरसे यांनी स्थानिक गुन्हे शाखा धुळे, यांनी निजामपूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेतकरी फरार असून त्याचा तपास पोलिस करीत आहेत.
सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत,सपोनि उमेश बोरसे ,पोसई अनिल पाटील,पसोई हनूमान उगले, स्थानिक गुन्हे शाखा अंगद आसटकर, नायब तहसीलदार साक्री प्रविण मोरे, सहाय्यक रासायनिक विश्लेषण पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यानी हि कारवाई केली आहे.