मोहाडीच्या त्या ओलीपार्टी प्रकरणी ९ जणांवर गुन्हा

Featured जळगाव
Share This:

जळगांवच्या भाजप नगरसेवक,पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश

जामनेर  :- गेल्या २१  एप्रिल रोजीच्या मोहाडी ता जामनेर येथील दत्तात्रय दिनकर पाटील यांच्या मालकीच्या शेतामधे झालेल्या ओल्या पार्टी प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या संशयीत आरोपींमधे शेतमालक, जळगांवच्या नगरसेवका सह एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
संशयीत आरोपींमधे कुलभुषण विरभान पाटील नगरसेवक जळगांव मनपा,विनोद संतोष चौधरी पोलीस कर्मचारी जळगांव,दत्तात्रय दिनकर पाटील शेतमालक,विठ्ठल भागवत पाटील रा अयोध्यानगर जळगांव,सुपडु मकडु सोनवणे रा बांभोरी,बाळु नामदेव चाटे रा रामेश्वर कॉलनी जळगांव,शुभम कैलास सोनवणे मयुरकॉलनी पिंप्राळा जळगांव,अबुलैस आफताफ मिर्झा कासमवाडी जळगांव,हर्षल जयदेव मावळे अयोध्या नगर जळगांव यांचा समावेश आहे.
गेल्या २१ एप्रील रोजी आयोजीत या ओल्या पार्टीची जिल्हाभरात क्लिप व्हायरल झाली होती,त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रारीद्वारा केली होती.फिर्यादी हवालदार अरविंद मोरे यांच्या नुसार वरील आरोपींनी शासनाची परवानगी न घेता जेवणाच्या रंगीत पार्टीचे आयोजन करून कोरोना विषाणु महामारीचा प्रादुर्भाव पसरील असे हयगयीचे कृत्य व सोशल डिस्टंस्टींगचे पालन झाले नसल्याने सर्व आरोपींविरोधात भादवी कलम २६९,१८८,साथीचे रोगनियंत्रण अधिनियम १८९७ चे कलम ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *