
कोरोनाबाधित ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन, केंद्र सरकारचा निर्णय
नई दिल्ली (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ७५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. याबद्दलचे आदेश संबंधित राज्य सरकारांना देण्यात आले असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी त्यावर अंमलबजावणी सुरू केली आहे. या ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित आढळून आलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे.
आज दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य आणि प्रधान सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिवदेखील बैठकीला हजर होते. पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे यावेळी सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांनी पंतप्रधानांच्या सचिवांना सांगितले.