
Coronavirus : धुळे जिल्ह्यात आणखी ५ रुग्ण आढळले
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि): करोना विषाणूचे धुळे जिल्ह्यात आज एकूण ५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात धुळे शहरात ४ तर शिंदखेडा तालुक्यातील एका ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
धुळे शहरातील चार रुग्णाचा वयोगट हा 20 ते 45 वर्ष दरम्यानचा आहे. या सर्व रुग्णावर श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. असे जिल्हा प्रशासनातर्फे आज सांयकाळी कळविण्यात आले आहे.दरम्यान धुळे शहरातील तिरंगा चौक परिसरात एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी हिरे महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.