
पिंपळनेर येथे आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, 28वर्षीय महिलेला कोरोणाची लागण
पिंपळनेर येथे आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, 28वर्षीय महिलेला कोरोणाची लागण
पिंपळनेर परिसरातील एकूण रुग्णांची संख्या 5
पिंपळनेर (तेज समाचार प्रतिनिधि): येथील महावीर भवनच्या पाठीमागील भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.त्यामूळे पिंपळनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गावसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथे राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान पॉझिटिव आढळलेली महिला गेल्या २ दिवसांपासून आजारी होती. रविवारी खोकला,ताप आल्याने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात तिने उपचार घेत डॉक्टरांनी तिला औषधे दिली.त्यानंतर सोमवारी तिच्या पोटात दुखत असल्याने सकाळी ती पुन्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली.यावेळी डॉक्टरांनी संबंधित महिलेला ऍडमिट केले होते.मात्र रात्री बारा वाजेच्या सुमारास तिच्या पतीने स्वतः डिस्चार्ज मागून घेतला. तर मंगळवारी सकाळी कासारे येथून परिचयातील एक खाजगी वाहन बोलून सकाळीच धुळे येथे रवाना झाले.त्यानंतर ८.३० वाजेच्या सुमारास संबंधीत महिलेचा स्वब नमुना घेण्यात आला होता.तो सायंकाळी पॉझिटिव्ह आढळला.
१५ मे रोजी संबंधित महिला आपल्या दिरासोबत कांदिवली,मुंबई येथून पिंपळनेर मध्ये आपल्या घरी आली होती. घरात बधित महिलेसह सासू, सासरे,पती व दिर असे पाच सदस्य राहतात.
त्यांपैकी लहान मुलगा हा मोठ्या भावाच्या पत्नीला घेऊन मुंबईहुन पिंपळनेर मध्ये १५ मे रोजी आला होता.
बाधित महिलेच्या घरात धुणे-भांडीची कामे करणाऱ्या एका महिलेला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.सदर काम करणारी महिला अनेकांच्या घरी धुणे-भांडीची कामे करत असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे महसूल व आरोग्य यंत्रणेचा ताण वाढला असून पॉझिटिव्ह आढळलेला रुग्णाच्या संपर्कामध्ये अजून किती जण आले आहेत हे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाअंती स्पष्ट होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.