
यावल पंचायत समिती आणि शिक्षण क्षेत्रात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रवेश
यावल पंचायत समिती आणि शिक्षण क्षेत्रात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रवेश
संपूर्ण राजकारणात एकच खळबळ.
यावल ( सुरेश पाटील ) : यावल तालुक्यात आज दिनांक 30 रोजी सकाळी फैजपूर येथे 4, साकळी येथे 7, मनवेल येथे 1 अट्रावल येथे 1 असे एकूण 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तसेच साकळी गांवात एकाच कुटुंबातील 6 जण कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने आणि या 13 रुग्णांमध्ये यावल पंचायत समिती मधील तसेच शिक्षणक्षेत्रात संबंधित एक लोकप्रतिनिधीचा समावेश असल्याने राजकारणासह संपूर्ण यावल तालुक्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, संबंधित लोकप्रतिनिधीचा रोजचा दांडगा जनसंपर्क आणि बैठक असल्याने त्यांच्या संपर्कात शेकडो ग्रामस्थ कार्यकर्ते आले असल्याने आरोग्य हिताच्या दृष्टीने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.