
अजून पुढील सात वर्ष राहू शकतो कोरोनाचा कहर
वॉशिंग्टन (तेज समाचार डेस्क). कोरोना लसीकरण जगातील अनेक देशात सुरू करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने हे लसीकरण सुरू आहे, त्यावरून तज्ञांनी एक अजब दावा केला आहे. कोरोनाचा कहर शमण्यासाठी अजून पुढील सात वर्षे लागू शकतात. असा दावा डॉ. एंथनी फाउची यांनी केला आहे. तसेच जगभरातील 75 टक्के नागरिकांची हर्ड इम्यूनिटी समान पातळीवर येण्यासाठी बराच मोठा कालावधी जाईल, असं एंथनी फाउची यांनी म्हटलंय.
– दर रोज 40 लाख जणांना कोरोनाची लस
दररोज सुमारे 40 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. अमेरिकेत एकूण जनसंख्येच्या केवळ 8.7 टक्के नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेत दररोज सुमारे 13 लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येते, अशी माहिती आहे.