
कोरोना रुग्णाचा उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना.ॲड.के.सी.पाडवी
कोरोना रुग्णाचा उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना.ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : कोरोनाचे संकट गंभीर असून नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ॲड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्यासाठी विलीनीकरण कक्ष उभारण्यात येईल याचबरोबर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दोनशे रुग्णांना पुरवठा होईल या पद्धतीचे बेड ऑक्सिजन उभारण्यात येणार आहे. आकांक्षी जिल्हा म्हणून सर्वाधिक निधी उपलब्ध करुन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी व त्यापेक्षा अधिक निधी लागला तरी जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री पाडवी यांनी केले .
यापूर्वी असलेल्या एकलव्य निवासी शाळेत 200 ते 275 बीडचे सर्व सुविधांनी युक्त कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येईल. जिल्ह्यातील प्रकाशा येथे 1000 रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे तसेच नंदुरबार येथे 200 बेड , शहादा येथे 100 बेड , नवापूर येथे 70 बेड चे ऑक्सिजन केंद्र उभारण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात 20 दिवसाच्या आत ऑक्सिजन केंद्रे उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक असून बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात विलगीकरण कक्ष उभारण्यात येईल प्रकाशा येथे गुजर समाजाचे सामाजिक भवनात सुमारे एक हजार आणि नवापूर येथे दीडशे रुग्णांचे विलगीकरण केंद्र उभारणे तसेच जिल्हा नियोजन निधीतुन सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचे सर्व सुविधांयुक्त स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री एड. के. सी. पाडवी यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
एक हजार ते बाराशे रुग्णांची व्यवस्था होईल असे मध्यवर्ती विलगीकरण केंद्र उभारण्यात येईल याठिकाणी शहादा, धडगाव, मोलगी, अक्कलकुवा येथील रुग्णांना उपचारासाठी आणता येईल. अपुऱ्या मनुष्यबळाचा अभाव इ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे याचबरोबर मदतीसाठी दोनशे परिचारिका असून नव्याने जी एन एम एन एम ची भरती करण्याचा नियोजन सुरू आहे.
कोरोना विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नागरिकांना आवाहन करावे. प्रत्येक गावात कोरोनाबाबत सर्वेक्षण आवश्यक असून त्याबाबत प्रशासनास सुचना देण्यात येतील.
[ राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ॲड.के.सी.पाडवी म्हणाले की , जिल्ह्यात मंडप टाकून रेमडीसीवर इंजेक्शन बाबत कोणी राजकारण करत असेल तर ते खपून घेणार नाही. नाव न घेता जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे कान टोचले. ]
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेद जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक रघुनाथ भोये आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, म्हणाले की , प्रशासनातर्फे कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, भर उन्हात पोलिस जवान जीवाची बाजी लावून सेवा करीत आहे. तोदेखील एक माणूस आहे.