यावल : साकळी गांवात कोरोनाचा प्रवेश, व्यापारीचा रिपोर्ट पॉजिटिव

Featured धुळे नाशिक
Share This:

यावल (सुरेश पाटील). यावल तालुक्यातील साकळी गांवात अनेकांच्या संपर्कात येत असलेला एक 56 वर्षीय व्यापारी कोरोना बाधित आढळून आल्याचे आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी समजल्याने संपूर्ण साखळी गांवात एकच खळबळ उडाली असून तो कोरोना रुग्ण व्यापारी असल्याने अनेकांच्या संपर्कात आला आल्याने साकळी गांवातील अनेकांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाला करावी लागेल असे संपूर्ण साखळी गांवात बोलले जात आहे.

तसेच यावल शहरात काल दिनांक 21 रोजी तब्बल 8 दिवसानंतर एक 67 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
यावल शहरात यावल ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, यावल नगरपरिषद कर्मचारी आणि संबंधित शासकीय यंत्रणा कोरोना विषाणू बाधा कोणाला होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत त्या प्रमाणे दिनांक 13 ते दिनांक 15 जून 2020 पर्यंत 3 दिवसाचा जनता कर्फ्यू नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या आव्हानानुसार यावलकरांनी काटेकोरपणे पाळला याचा सकारात्मक फायदा यावल करांना दिसून आला आहे, आता पुन्हा 3 किंवा 5 दिवसाचा जनता कर्फ्यू सर्व नागरिकांनी पाळावा जेणेकरून कोरोना विषाणू यावल शहरातून हद्दपार होईल असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

यावल शहरात गेल्या महिन्या पासून आज दिनांक 21 जून 2020 पर्यंत एकूण 38 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 15 रुग्ण कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतले आहेत, 17 रुग्ण कोविड सेंटरला दाखल आहेत, तर 5 जणांचा कोरोना बाधेमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

यावल तालुक्यात एकूण 84 गावांपैकी 20 गावांत तथा ग्रामीण भागात कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे, त्यात एकूण यावल शहरासह 113 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 69 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते रुग्ण सुखरुप घरी परतले, 31 रुग्ण कोविड सेंटरला दाखल आहेत, तालुक्यात आतापर्यंत एकूण 13 रूग्ण मयत झाले आहेत. अशा सर्व वस्तुस्थितीवर यावल तालुका आरोग्य विभाग, यावल ग्रामीण रुग्णालय, न्हावी ग्रामीण रुग्णालय,आणि तालुक्यात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र, यांच्यासह यावल नगरपालिका, फैजपुर नगरपालिका मुख्याधिकारी व त्यांचे नगरपरिषद कर्मचारी, यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे फैजपुर एपीआय आणि पीएसआय हे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार यावल जितेंद्र कुंवर यांचे मार्गदर्शनाखाली शासनाच्या आदेशानुसार अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

संपर्कात येणाऱ्याकडे कोरोनाचे जास्त लक्ष
साकळी गांवातील एका व्यापाऱ्याला कोरोना बाधा झाल्याचे आज दिनांक 22 रोजी सकाळी उघड झाल्यामुळे जे नागरिक दैनंदिन रित्या आपापल्या व्यवहारामुळे किंवा इतर कामांमुळे एकमेकांच्या संपर्कात जास्त प्रमाणात येतात, तसेच संपर्कात येत असताना सोशल डिस्टन्स न बाळगता किंवा तोंडावर नाकावर माक्स न लावता मला किंवा आम्हाला काही होणार नाही अशा मोठ्या आत्मविश्वासामुळे खुलेआम एकमेकाच्या संपर्कात येत असतात यामुळे कोरोना विषाणू त्यांना तात्काळ बाधित करीत असतो असे स्पष्ट दिसून आले आहे , त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स बाळगून तोंडा नाकावर माक्स लावून आणि आरोग्य विभागाने दिलेल्या ईतर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *