कोरोना वायरस चे सावट धुळीवडीवर पारंपरिक रंग गुलालाची उधळण करत धुलीवंदन साजरा

Featured धुळे
Share This:
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि) :  शहरात धुलीवंदनाच्या निमित्ताने कोरोना व्हायरस  भीतीपोटी यंदा उत्साह कमी दिसून आला. पारंपारिक गुलाल पुष्पवृष्टी करून धुलीवंदन नागरिकांनी साध्या पध्दतीने साजरा केला.
कोरोना वायरस प्रभाव पाहिला मिळाला रंगांची उधळण कोणी केली नाही व गर्दीत सहभागी होणे लोकांनी टाळले.व्हायरस भितीमूळे नागरिकांनी गर्दीत सहभाग घेतला नाही. चायना वस्तू ऑईलीरंग, पिचकाऱ्या चायना कंपनीच्या वस्तूं खरेदी करण्यापासून नागरिकांनी दूरच राहण्याचा प्रयत्न केला.
शहरातील गिंडोडिया कंपाउंड, खंडेराव बाजार, पाचकंदील चौक ,मिरच्या मारुती खुंट, गांधी पुतळा ,जुने धुळे, दत्त मंदिर कुमार नगर, पारोळा बाजार ,समिती आवर, वाखरकर नगर बाजारात मोठ्या धामधुमीत विविध रंगांची उधळण करत रंगबिरंगी एकमेकांना लावत धुलीवंदन साजरा करण्यात येतो परंतु यंदा हा उत्साह अल्प प्रमाणात दिसून आला.
कोरना व्हायरस भीतीमुळे शहरातील चौका, चौकात डि.जे च्या तालावर नाचत तरूण दंग होतात.ते यंदा तेप्रमाण कमी होते. साध्या पद्धतीने नागरिकांनी धुळवड साजरी केली. धुलीवंदन निमित्त तृतियपंथीनी बर्फ कारखाना जवळील परिसरात पारंपरिक रंगांची उधळण व पाण्याचा मारा करत धुळवडीचा आनंद लुटला.
सालाबादाप्रमाणे धुलीवंदन चौकाचौकात ज्याप्रमाणे रंगांचे व पाण्याचा मारा करण्यासाठी एकमेकांमध्येजी चढाओढ दिसून येते. ती यंदा दिसून आली नाही.
तरुण-तरुणी,महिला,पूरुष, लहान मुले धुळवड आनंद लुटतात .तो उत्साह यंदा पाहिला मिळाला नाही.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *