
Corona Virus: धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा – माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे कळकळीचे आवाहन
Corona Virus: धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा – माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे कळकळीचे आवाहन
शिरपूर (तेज समाचार डेस्क):– कोरोना व्हायरस सर्वत्र रुद्र रूप धारण करत आहे. भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वांनी गांभीर्याने घ्या. तालुक्यातील आमोदे गावात कोरोनाग्रस्त एक रुग्ण आढळून आला आहे. सर्वांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, बाहेरगावाहून कोणीही आल्यावर प्रशासनाला कळवावे. स्वतः हून तपासणी करून घ्यावी. कोरोना बाबत कोणीही हलगर्जीपणा करू नये. तसेच बेजबाबदार पणे देखील वागण्याचा प्रयत्न करू नये.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी आपण सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे अतिशय भावनिक व कळकळीचे आवाहन माजी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. फार प्रमाणात बऱ्याच ठिकाणी लोक घराबाहेर फिरतांना दिसून येत आहेत. अत्यावश्यक गरजेशिवाय कोणीही बाहेर फिरु नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वारंवार जनतेला आवाहन केले आहे. त्या आवाहनाला सर्वांनी चांगला सकारात्मक प्रतिसाद द्यायचा आहे.
संपूर्ण जगात व देशात कोरोना व्हायरस ने मोठ्या प्रमाणात आक्रमक केले आहे. सर्वांनी घरातच राहणे खूपच आवश्यक आहे. स्वतःसाठी व आपल्या परिवाराच्या भल्यासाठी आपण सक्तीने घरातच रहावे.
अनेक लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. हे अजिबात चांगले नाही. आपल्यामुळे कोणाला व इतरांमुळे आपल्याला अजिबात त्रास होता कामा नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी. नगर परिषद प्रशासनाला, शासकीय यंत्रणेला व पोलीस यंत्रणेला सर्वांनी सहकार्य करावे. कोरोना व्हायरस ने सर्वत्र प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात संकट संपूर्ण जगावर व आपल्या देशावर आलेले आहे. संपूर्ण जगाला या महाभयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सर्वांनी खूपच गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपल्या स्वतःची व इतरांची काळजी घ्यायची आहे. माणुसकी न विसरता व कोणताही धोका न पत्करता आलेल्या प्रसंगाला सर्वांनी तोंड द्यायचे आहे.
पोलिस प्रशासनाला नाईलाजाने बाहेर निघणाऱ्यांना काही प्रमाणात चोप द्यावा लागत आहे. कोणी पायी तर कोणी आपल्या वाहनाने फिरतांना दिसून येत आहेत, हे अजिबात योग्य नाही. आता पुन्हा पुन्हा सर्वत्र संचारबंदी देखील लागू झाली असल्याने सर्व नियमांचे पालन करावे.
सर्वांना विनंती आहे की, विनाकारण कुठेही फिरू नका. घरातच रहा. आपल्या घरातील प्रत्येकाला देखील बाहेर जाऊ देऊ नका. घरातील मोठ्यांची व लहानांची देखील काळजी घ्या. सर्वांनी स्वतःची व आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
सर्वांनी प्रशासनाला मनापासून सहकार्य करावे. नगर परिषदेला सहकार्य करावे. कुठेही काहीही शंकास्पद आढळून आल्यास नगर परिषद, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांना कळवावे असे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले आहे.