कोरोनाने घेतला सानेगुरुजी विद्यालयातील दोन शिक्षकांचा बळी- शिक्षण क्षेत्रात खळबळ

Featured जळगाव
Share This:

कोरोनाने घेतला सानेगुरुजी विद्यालयातील दोन शिक्षकांचा बळी- शिक्षण क्षेत्रात खळबळ.

यावल ( सुरेश पाटील): यावल नगरपरिषद संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन पदवीधर शिक्षकांचा गेल्या पंधरा दिवसात कोरोनाने बळी घेतल्याने शिक्षक-शिक्षकेतर प्राध्यापक कर्मचारी वर्गात आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याकडे मुख्याध्यापक एम.के.पाटील यांनी लक्ष केंद्रीत करून सर्व शिक्षक प्राध्यापकांना विश्वासात घेऊन कोरोना संदर्भात सतर्कता बाळगायला पाहिजे असे बोलले जात आहे.
साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील संगीत विषयाचे शिक्षक संजय परदेशी यांचे 8 दिवसापूर्वी आणि इंग्रजी विषयाचे शिक्षक टी.एस.पाटील यांचे गेल्या 2 दिवसापूर्वी कोरोना मुळे दुःखद निधन झाले या दोन शिक्षकांचा बळी गेल्याने यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी विद्यालयाचे सॅनिटायझर आतापर्यंत किती वेळा झाले, नगरपालिकेने जंतूनाशक फवारणी किती वेळा केली? किंवा नाही. विद्यालयात शैक्षणिक कामकाज करताना सोशल डिस्टन्सचा आणि माक्सचा वापर करण्यात आला होता किंवा नाही.कोरोनामुळे विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविणे बंद असल्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीबाबत आणि कार्यालयीन कामकाजा बाबत जिल्हाधिकारी,शिक्षण अधिकारी, यावल नगरपालिका मुख्याधिकारी यावल तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करण्यात आले होते का? विद्यालयात विद्यार्थी जर येत नव्हते आणि विद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजाची माहिती कार्यालयात उपलब्ध असल्यामुळे सानेगुरुजी विद्यालयातील शिक्षक विद्यालयात कोणत्या महत्त्वाच्या कामाने उपस्थित राहत होते किंवा कार्यालयीन मीटिंग घेताना शिक्षक प्राध्यापकांनी सोशल डिस्टन्स न पाळता आपल्या तोंडावर मुख्य पट्टी लावलेली होती किंवा नाही इत्यादीचे चित्रण विद्यालयातीलच सीसीटीव्ही कॅमेरात बंद झालेले असेलच याची चौकशी झाल्यास दोन शिक्षकांना कोरोनाची बाधा कुठे केव्हा आणि कशी झाली? आणि यात त्यां दोघांचा बळी गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आणि इतर काही शिक्षकांना सुद्धा कोरोनाची बाधा होऊन शारीरिक,मानसिक,आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि साने गुरुजी विद्यालयातील शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व सदस्यांनी शैक्षणिक ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांकडे तसेच प्राध्यापकांच्या आरोग्याकडे आपले लक्ष केंद्रित करून तत्काळ उपाययोजना करावी जेणेकरून विद्यालयाच्या माध्यमातून कोणाचा बळी जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *